शेतकर्‍यांना तत्काळ भरपाई मिळावी!

आ.मंजुळा गावीत यांना मनसेचे निवेदन
साक्री :

तालुक्यात झालेल्या अवकाळी तथा बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष राज्य उपाध्यक्ष धीरज देसले यांनी आ.मंजुळा गावीत यांना निवेदन दिले.

तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटांचा अहोरात्र सामना करीत आहे. फेब्रुवारी महिन्यात तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. दुःखी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने आपण लक्ष घालून, आठ दिवसाच्या आत आर्थिक मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावी. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्मान सेने चे राज्य उपाध्यक्ष धिरज देसले, साक्री तालुका अध्यक्ष संदिप बच्छाव, साक्री तालुका उपाध्यक्ष योगेश मोरे, बाळासाहेब देसले आदी उपस्थित होते.

You May Also Like