तिबेट हिमक्षेत्रात पंधरा हजार वर्षापूर्वीचे 33 जिवंत व्हायरस

वॉशिंग्टन । तिबेटमधील हिमक्षेत्रात तब्बल 15 हजार वर्ष जुने असे 33 व्हायरस सापडले आहेत.  तिबेटमधील बर्फात सापडलेले हे सर्व व्हायरस किमान पंधरा हजार वर्षे जुने असल्याचा दावा या सर्व संशोधकांनी केला आहे. तिबेटच्या पठारावरील कोन लाऊन शान या हिम क्षेत्रातून जो बर्फ आणण्यात आला होता त्या बर्फात असलेल्या सर्वसाधारण विषाणूंची माहिती घेत असताना या नवीन विषाणूंचा शोध समोर आला. या हिमक्षेत्रातून संशोधकांनी 2015 मध्ये बर्फाचे दोन सॅम्पल आणले होते. हे हिम क्षेत्र समुद्र पातळीपासून तब्बल बावीस हजार फूट उंचीवर होते.

 

हे व्हायरस प्रथमच हे सर्व संशोधक पाहत होते. त्यापैकी पाच व्हायरस सर्वसाधारण होते. संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पश्‍चिम चीनमधील हिंमक्षेत्राचे अद्यापपर्यंत योग्य प्रमाणात संशोधन करण्यात आलेले नाही. आगामी कालावधीमध्ये या क्षेत्रांचे संशोधन झाले तर व्हायरस बाबत अजून काही नवीन माहिती उपलब्ध होऊ शकते.

You May Also Like

error: Content is protected !!