खासदार इम्तियाज जलिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद । स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर जमाव जमवून निदर्शने करत कोविड प्रतिबंधांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल आणि त्यांच्या अन्य 24 पक्ष सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेतच क्रीडा विद्यापीठ सुरू करावे या मागणीसाठी त्यांनी ही निदर्शने आयोजित केली होती. यावेळी त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी काळे झेंडे फडकावले होते.

 

 

जलिल म्हणाले की, आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही जनतेच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करीतच राहणार आहोत. त्यांच्या विरोधात बेकायदा जमाव जमवल्याच्या कारणासह अन्यही अनेक कारणांवरूनही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

You May Also Like