मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; कारण….

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय तेढ वाढत असून राज्यात गेल्या दोन दिवसांत राजकीय वातावरण जास्तच तापले आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ सोडून मातोश्रीवर ते रवाना झाले. दरम्यान रस्त्यावर हजारो शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत उद्धव ठाकरेंचे स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील गाड्यांचा ताफा थांबवून शिवसैनिकांचे आभिवादन स्वीकारले आहे.

या राजकीय घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मलबार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ऑनलाइन पद्धतीने फिर्याद दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी करोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप बग्गा यांनी केला आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती आज सकाळी माध्यमांकडून देण्यात आली होती. सायंकाळी (दि. 22 जून) फेसबूक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधताना देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्याला करोनाची बाधा झाल्याचे सांगितलं होते. असे असताना देखील मुख्यमंत्री अनेक शिवसैनिकांना भेटले, करोना नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाली असेल तर त्याला कुणालाही भेटता येत नाही. रुग्णाला क्वारंटाईन केले जाते. असे असताना देखील मुख्यमंत्री सर्वांना भेटत असल्याचे बातम्यांमध्ये दिसले आहे. याआधारे तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like