…अखेर बुवाविरोधात गुन्हा दाखल! वृद्ध पत्नीला मारहाण भोवली

उल्हासनगर : कल्याण तालुक्यातील द्वारली गावातील 85 वर्षीय तथाकथित बुवा त्याच्या 80 वर्षीय पत्नीला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी संबंधित वृद्धाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गजानन चिकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याणच्या द्वारली या गावामध्ये राहणारे गजानन चिकणकर हे स्वतः बुवा असल्याचं सांगतात. मात्र भक्तांना उपदेश देणार्‍या या महाराजांनी स्वतःच्या पत्नीलाच बेदम मारहाण केली होती. 80 वर्षाच्या वृद्ध पत्नीला काम करत नसल्याच्या कारणाववरून त्यांनी मारहाण केली होती. विशेष म्हणजे या बुवांना दोन बायका आहेत. त्यापैकी पहिल्या पत्नीला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. आजुबाजुला असलेल्या इतर महिला आणि कुटुंबातील व्यक्तींनीही त्यांना अडवलं नाही.

व्हिडिओमध्ये दिसणारं दृश्य अत्यंत गंभीर आहे. हा व्यक्ती पत्नीला वारंवार मारहाण करत पुन्हा असं करशील का अशी विचारणा करताना दिसत आहे. लाथांनी आणि अगदी हातातील बादलीनं त्यानं पत्नीला मारहाण केली. यानंतरही या वृद्धानं पत्नीला ओढत नेत भिंतीवर आदळलं. घरातून बाहेर काढण्यासाठी तो तिला ओढून नेत असल्याचंही पाहायला मिळालं.

You May Also Like