अखेर….नाशिकमधील तो विवाह सोहळा रद्द

हिंदू मुलीचे मुस्लिम मुलासोबत होणार होते लग्न
नाशिक । येथील दोन वेगवेगळ्या धर्मातील युवक व युवतीला लग्न करायचे होते. हे लग्न दोन्ही परिवारांना मान्य असून त्यासाठी त्यांनी लग्नाचे कार्डदेखील छापले होते. परंतु काहींना ही बाब मान्य नव्हती. त्यांनी या लग्नाला लव्ह जिहादचे रंग देत हे कार्ड सगळीकडे व्हायरल केले. त्यामुळे दोन्ही परिवारांना मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. म्हणून त्यांनी हा लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मुलीचे वडील प्रसाद आडगावकर हे सोन्या-चांदीचे व्यापारी आहेत. ते म्हणाले कि, दोन्ही परिवाराच्या स्वखुशीने आणि उपस्थित युवक युवतीने नाशिक न्यायालयातील कोर्टात रजिस्टर पद्धतीने लग्न केले आहे. परंतु दोन्ही परिवारांना पारंपारिक पद्धतीने लग्न करायचे असल्यामुळे त्यांनी 18 जुलै रोजी लग्न करणार होते. यासाठी नाशिक येथील एक मोठे हॉटेल बुक करण्यात आले असून सगळी तयारी झाली होती. हे लग्न स्वखुषीने असून जबरदस्तीने नसल्याचे युवतीचे वडील प्रसाद आडगावकर यांनी सांगितले. त्यासोबतच आमचे दोन्ही परिवार युवक-युवती सोबत खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

 

एकमेकांना ओळखतात अनेक वर्षापासून
आडगावकर पुढे म्हणाले की, रसिका ही अपंग असल्यामुळे तिला मुलगा शोधण्यासाठी मोठी अडचण होत होती. परंतु नुकतेच रसिका आणि त्याचा सोबत शिक्षण घेणारा त्यांचा मित्र आसिफ खान याने स्वखुषीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही परिवार एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत असून त्यामुळे त्यांनी लग्नास होकार दिला असे आडगावकर म्हणाले.

 

लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल
प्रसाद आडगावकर यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता काही मोजक्याच लोकांना लग्नात आमंत्रित करण्याचा विचार होता. पण त्यापूर्वीच हे कार्ड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यानंतर दोन्ही परिवारांना धमकी देणारे कॉल्स आणि मेसेजेस या लागले. 9 जुलै रोजी काही लोकांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले तुला आणि हे लग्न रद्द करा असे सांगितले होते.

You May Also Like