अखेर बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह सोहळा पडला पार

नाशिक ।  येथे गेल्या महिन्यापासुन आंतरधर्मिय विवाहाची चर्चा चालू होती. त्यात अनेक वादही झाले. मुलीच्या जातीची जातपंचायत व काही धार्मिक संघटनांनी यास कडाडून विरोध केला होता. पण तरीही हा विवाह सोहळा काल अगदी मोजक्या लोकांमध्ये हाॅटेल एसएसके येथे पार पडला.

हिंदु व मुस्लिम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला. या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांचे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी हजर होते. संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याचे समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

You May Also Like