पुण्यातील मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीतील क्लोरिफाईड कंपनीत आग

पुणे | पुण्यातील मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीतील क्लोरिफाईड कंपनीत आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या कंपनीचे नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असे आहे. यात १८ कर्मचाऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारी २च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या आगीत ज्यांचा मृत्यु झाला त्यांच्या नातेवाईकांना सरकारने मदत जाहीर केली आहे.

‘पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

You May Also Like

error: Content is protected !!