देशात पहिलीच केस ! पांढर्‍या बुरशीमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र

नवी दिल्ली : जगभरात करोनाने हात-पाय पसरले असतांना आता ब्लॅक आणि व्हाइट फंगसमुळेही चिंता वाढली आहे. राजधानी दिल्लीत व्हाइट फंगसचे एक प्रकरण समोर आलंय. फंगसमुळे त्या महिलेच्या आतड्यांना छिद्रे पडल्याचे दिसून आले आहे.

दिल्लीतील गंगाराम रुग्णालयाने याबाबत माहिती दिलीयं. रुग्णालयाने म्हटले कि, 49 वर्षांच्या एक महिलेला 13 मे 2021 रोजी सर गंगाराम रुग्णालयात इमर्जन्सीमध्ये आणण्यात आले होते. तेव्हा या महिलेच्या पोटात अत्यंत वेदना होत होत्या. संबंधित महिलेचे रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आले. तेव्हा त्यांच्या आतड्यांत छिद्रे असल्याचे दिसून आले. यानंतर त्या महिलेची सर्जरी करण्यात आली. यात या महिलेच्या अन्न नलिका, छोटे आतडे तथा मोठ्या आतड्यांन पडलेली छिद्रे बंद करण्यात आली. स्टेरॉयइडच्या वापरानंतर ब्लॅक फंगसमुळे आतड्यांत छिद्र पडल्याची काही प्रकरणं नुकतीच समोर आली आहेत. मात्र, व्हाइट फंगसमुळे कोविड-19 इन्फेक्शननंतर, अन्न नलिका, छोट्या आणि मोठ्या आतड्यांत छिदे पडण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे, असेही डॉ. अरोडा यांनी सांगितलंय.

बायप्सीनंतर आतड्यांची माहिती आली समोर
रुग्णालयातील डॉ. अनिल अरोडा यांनी सांगितले, की आतड्यातून काढलेल्या तुकड्यांच्या बायप्सीनंतर लक्षात आले, की आतड्यांत व्हाइट फंगस आहे. यामुळे आतड्यांमध्ये फोडांसारखे घाव झाल्याने, अन्न नलिकेपासून छोट्या आणि मोठ्या आतड्यांत छिद्रे पडली होती.

 

You May Also Like