नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : आणखी पाच जण दगावले, मृतांचा आकडा 29 पोहोचला

नाशिक : काल नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्ण दगावल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दरम्यान मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.  वाढला आहे. रात्री उशिरा आणखी पाच जण दगावले. यानंतर मृतांचा आकडा हा 29 पोहोचला आहे. तांत्रिक दोषांमुळे ऑक्सिजन गळतीची ही घटना घडली होती. यावेळी 22 रुग्णाचे तडफडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी दोघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत्यूची संख्या 24 झाली होती.

दरम्यान, ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या घटनेचा तपास आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

राधाकृष्ण गमे यांचे अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली असून या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. यामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गुंजाळ, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे, महापालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे तसेच ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण राज्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे हर्षल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like