श्रीनगरमध्ये चकमक; लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडरचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील मलोरा पारिमपोरा भागात सोमवारी संध्याकाळपासून दशहदवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान सोमवारी सायंकाळीच याठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान आता यात एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा आणि लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

दरम्यान सोमवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला असल्याचं समोर आलं आहे. दरम्याण, पोलिसांनी सांगितले कि, हायवेवर काही दहशवादी हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ सीआरपीएफ आणि पोलिसांनी हायवेवर नाकाबंदी केली. यावेळी पारीमपोरा नावा येथे पोलिसांनी एक गाडी अडवून आतील व्यक्तींना विचारपूस केली असता आत बसलेला एक व्यक्ती आपली बॅग उघडून त्यातून ग्रेनेड बाहेर काढू लागला. यानंतर या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. ड्रायव्हरसह या व्यक्तीला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. याठिकाणी त्यांचे मास्क काढले असता हा लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर असल्याचं लक्षात आलं. दरम्याण, या टॉप कमांडरचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेजला  आणि  टि्वटरवर  आम्हाला फॉलो करा…

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like