‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंह यांचे शुक्रवारी (18 जून) निधन झाले.

मुंबई : ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंह यांचे शुक्रवारी (18 जून) निधन झाले. मिल्खा सिंह यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच वेळी मिल्खा सिंह यांच्या जाण्याने पडद्यावर ‘मिल्खा सिंह’ साकारलेल्या अभिनेता फरहान अख्तर याला मोठा धक्का बसला आहे. फरहानने मिल्खा यांच्यासाठी एक भावूक संदेश लिहिला आहे, ज्याद्वारे त्याने आपले मिल्खा सिंह यांच्यावर किती प्रेम होते, हे सांगितले आहे
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने मिल्खा सिंह यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, ‘प्रिय मिल्खा सिंह, तुम्ही आता आमच्यात नाहीत, यावर माझा विश्वास बसत नाहीय. कदाचित हा माझ्या मनाचा एक भाग असेल, जो तुमच्याकडून मला मिळाला आहे. हे सत्य आहे की, आपण नेहमीच आमच्यात जिवंत राहाल, कारण तुमचे हृदय खूप मोठे होते आणि आपण मातीशी जोडलेले होतात.’

फरहानने पुढे लिहिले की, ‘तुम्ही स्वप्नांना सत्यात उतरवलंत. कठोर परिश्रम, सत्यता आणि दृढनिश्चयाने आपण आपल्या जमीनवर पाय रोवून आकाशाला कसे स्पर्श करू शकता, हे आम्हाला शिकवलंत. आपण आमच्या सर्वांच्या जीवनास स्पर्श केला आहे. जे तुम्हाला एक पिता आणि मित्र म्हणून ओळखत असत, त्यांच्यासाठी हा आशीर्वाद आहे. मी मनापासून तुमच्यावर प्रेम करतो. ‘

You May Also Like