’ब्लू टीक’ ऐवजी नागरिकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या’

मुंबई : ट्विटरवरील ’ब्लू टीक’मुळे सुरू झालेल्या वादाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ’ट्विटरवरील ब्लू टीक’ आणि लसीकरण यातील फरक केंद्र सरकारनं सर्वप्रथम समजून घ्यावा आणि ’ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडं अधिक लक्ष द्यावं,’ असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

मदेशातील जनता सध्या लसीकरणाची लढाई लढत आहे. तर, दुसरीकडे संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार मब्लू टीकफ ची लढाई लढताना दिसत आहे. देशभरातून होणार्‍या टीकेकडे देखील केंद्र सरकार दुर्लक्ष करत असून आपल्याच अहंकारात मश्गुल आहे,फ असं मलिक यांनी म्हटलं आहे.

कुठल्याही ट्विटर हँडलवरील ’ब्लू टीक’ ही ते अकाऊंट प्रमाणित असल्याचं चिन्ह असतं. दोन दिवसांपूर्वीच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह काही नेत्यांच्या ट्वीवटर हँडलवर ’ब्लू टीक’ हटवण्यात आली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. केंद्र सरकारनं यावरून ट्वीटरला नोटीसही बजावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावरूनच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

’महाराष्ट्रात आणि देशात करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून सरकारनं घालून दिलेल्या नियमाचं पालन केल्यामुळं हे शक्य झाल्याचा मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे. ’अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सध्या दहा जिल्हयांना मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. काही जिल्ह्यांत कमी, तर काही जिल्ह्यांत जास्तच निर्बंध आहेत. लोकांनी सरकारला असंच सहकार्य केल्यास आपण लवकरात लवकर करोनामुक्त होऊ,’ असे मलिक यांनी सांगितलंय.

You May Also Like