मध्यरेल्वेच्या कल्याण गुडस यार्ड येथे महिला टीमने प्रथमच मालवाहतूक ट्रेन दुरुस्तीचे काम

पुणे – मध्यरेल्वेच्या कल्याण गुडस यार्ड येथे महिला टीमने प्रथमच मालवाहतूक ट्रेन दुरुस्तीचे काम केले. यामध्ये गिअर तपासणी, एअर ब्रेक टेस्टिंग, अंडर फ्रेम्सची तपासणी, साइड पॅनेल्स, सदोष घटक आणि संबंधित दुरुस्तीचे काम करण्यात आले. साडेचार तासात हे काम पूर्ण करून या रेल्वेच्या पुढील प्रवासासाठी तयार ठेवण्यात आली.

रेल्वेकडून मालवाहतुकीवर भर देण्यात येत आहे. यासाठी रेल्वेकडून विशेष प्रयत्नदेखील केले जात आहेत. या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेची ठराविक फेऱ्यानंतर तपासणी करण्यात येते. प्रथमच या तपासणीसाठी महिला पथकाची नियुक्‍ती करण्यात आली होती.

रेल्वे प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या, रेल्वेचे सारथ्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे मालगाडीचे परीक्षण करणाऱ्या या टीमचे सोशल मीडियावर नेटिझन्सकडून कौतुक करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या कल्याण गुडस यार्ड येथे मालवाहतूक करणाऱ्या रेकची/ रेल्वेची तपासणी महिलांच्या पथकाने केली असून परीक्षण करणारी ही महिलांची पहिलीच तुकडी आहे. स्टील लोडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या 44 बीओएसटी प्रकारच्या रिक्‍त वॅगनच्या रॅकची तपासणी अर्चना जाधव, ज्योती दामोदरे, अश्‍वनी पाटील, श्‍वेता सूर्यवंशी

प्रियांका खोलेकर, दिपाली, सुनीता, सविता, सुजाता आणि खुशबू या कर्मचाऱ्यांच्या टीमने पूर्ण केली. तर पुढील नियोजित प्रवासासाठी रेक फिट करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

You May Also Like