माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली । न्यूझीलंड संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सची प्रकृती चिंताजनक आहे. ऑस्ट्रेलियातील कॅनाबेरा येथील एका रुग्णालयामध्ये लाइफ सपोर्टवर ठेवण्यात असल्याचं वृत्त हाती येत आहे.  नुकताच एका ठिकाणी ख्रिस घसरुन पडल्याने तो जखमी झाल्याचं वृत्त न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

 

 

दरम्यान, ५१ वर्षीय ख्रिसवर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रीय झाल्या असून त्याची प्रकृतीत बिघाड होत आहे. ख्रिसला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्या असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आल्या. मात्र या शस्त्रक्रीयांना त्याच्या शरीराने म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने दिवसोंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली आहे.

You May Also Like