माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचे आई-वडील करोना पॉझिटिव्ह

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आज मुंबईमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामान्यात संघाचं नेतृत्व करण्यासाठी वानखेडे मैदानात उतरणार आहे. दरम्यान,  महेंद्रसिंह धोनीच्या आई वडिलांना करोनाचा संसर्ग झाला आहे. धोनीचे आई-वडील करोना पॉझिटिव्ह असून त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका देवी यांच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धोनीच्या आई-वडिलांना दाखल करण्यात आलेल्या पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दोघांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सामान्य असून त्यांच्या फुफ्फुसांना करोनाचा संसर्ग झालेला नाही. उपचारांनंतर पुढील काही दिवसांमध्ये धोनीचे आई वडील ठणठणीत बरे होतील अशा विश्वासही डॉक्टरांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, २०२० मध्ये युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलनंतर धोनी आपल्या कुटुंबियांसोबतच होता. या काळादरम्यान तो कोणत्याही क्रिकेट स्पर्धांमध्ये दिसून आला आहे. थेट यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळण्यासाठी तो मार्चच्या सुरुवातील चेन्नईमधील संघाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये दाखल झाल्याचं पहायला मिळालं. करोना निर्बंधांमुळे प्रत्येक संघाचे सामने नियोजित मैदानामध्येच होत आहे. त्यामुळेच ९ एप्रिलपासून सुरु झालेल्या आयपीएलच्या काही दिवस आधीच चेन्नईची टीम मुंबईत दाखल झाली. त्यानंतर सात दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर संघ मैदानात उतरला.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like