अणू उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. बॅनर्जी यांचे निधन

मुंबई : अणू उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचे निधन आज मुंबईत राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. गेल्या महिन्यात डॉ. बॅनर्जी यांना करोनाची देखील लागण झाली होती.

डॉ. बॅनर्जी 2010 पर्यंत सहा वर्षे भाभा अणू संशोधन केंद्राचे (बार्क) ते संचालकही होते. आयआयटी खरगपूरचे धातू विज्ञान इंजिनीयर असलेले डॉ. बॅनर्जी यांनी बीटेकची पदवी मिळवल्यांनंतर भाभा अणू संशोधन केंद्राशी जोडले गेले होते. ते या संथेच्या संचालकपदापर्यंत पोहोचले होते. डॉ. बॅनर्जी यांचे काम भौतिक धातू आणि धातू विज्ञानावर आधारित होते. त्यांनी आपल्या कारकीर्दित अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांमध्ये सन 2005 मध्ये पद्मश्री आणि सन 1989 मध्ये मिळालेल्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराचाही समावेश आहे.

You May Also Like

error: Content is protected !!