गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात अटक झालेल्या माजी खासदार संजय काकडेंना जामीन

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची कारागृहातून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी एक रॅली काढली होती. या रॅलीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. मोठ्या प्रमाणात आलिशान गाड्या या रॅलीत दिसून आल्या होत्या. माजी खासदार संजय काकडे यांनी या रॅलीसाठी गाड्या पुरवल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी माजी खासदार संजय काकडे यांना अटक केली होती.

दरम्यान,  पुण्यातील शिवाजी नगर न्यायलयाने संजय काकडे यांना जामीन मंजूर केला आहे. संजय काकडे यांना अटक केल्यानंतर आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायलयाने काकडे यांचा जामीन मंजूर केला आहे. शिवाजीनगर सत्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर केला आहे.

माजी खासदार असलेले संजय काकडे यांच्या काही गाड्या गजा मारणेच्या रॅलीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने संजय काकडे यांना अटक केली .

रॅली प्रकरणाबद्दल अधिक माहिती अशी कि, अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यावर पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची नवी मुंबईतील तळोजा जेलमधून सुटका करण्यात आली होती. यावेळी गजानन मारणे याच्या समर्थकांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. आलिशान गाड्यांसह मोठ्या थाटामाटात त्याने रॅली काढली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like