माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची करोनावर मात

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना करोनाची लागण झाल्यानंतर, १९ एप्रिल रोजी एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.८८ वर्षीय मनमोहन सिंग  यांनी करोनावर मात केली  त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स रूग्णालयातून बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

मनमोहन सिंग यांनी करोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले होते. त्यांनी पहिला डोस ४ मार्च रोजी तर दुसरा ३ एप्रिल रोजी देण्यात आला होता. मात्र करोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like