माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना करोनाची लागण

मुंबई : सध्या करोनाचे सावट सवत्र पसरले आहे, या दरम्यान अनेक नेते मंडळींना करोनाने गाठले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना करोनाची लागण झाली आहे. राम नाईक यांनी स्वत:ला गोरंगाव पूर्व, गोकुळधाम येथील लक्षचंडी सोसायटीमधील त्यांच्या घरीच विलगीकरण केले आहे.

राम नाईक यांना थोडा ताप आला होता. त्यानंतर त्यांनी लागलीच कोरोना चाचणी केली. या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, मालाड पूर्व संजीवनी रुग्णालयाचे डॉ. सुनिल अग्रवाल व डॉ. राजेश बिनयाला यांच्या देखरेखीखाली राम नाईक यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची तब्येत सुधारत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी ६८ हजार ६३१ रुग्ण आणि ५०३ मृत्यूंची नोंद झाली आहे, परिणामी कोरोना बाधितांची एकूण संख्या ३८ लाख ३९ हजार ३३८ असून मृतांचा एकूण आकडा ६० हजार ४७३ झाला आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6 

 

You May Also Like