केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले यांचे करोनामुळे निधन

पुणे : नागालँडचे माजी मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत माधव गोखले (वय ७५) यांचे कोरोनामुळे निधन झाले.

गोखले यांचा जन्म ३ जानेवारी १९४६ रोजी झाला.  व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड आणि जवाहर रोजगार योजना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित केले होते.

तसेच, ९६५ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयामध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ नौदलामध्ये काम केले. त्यानंतर ते नागालँड केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रूजू झाले. विविध पदांवर काम करताना गोखले यांनी नागालँड येथे ग्रामीण विकासामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले.

तसच, नागालँड एम्पॉवरमेंट ऑफ पिपल थ्रू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (एनईपीईडी) योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये गोखले यांना यश आले. १९८७ ते १९९२ या कालावधीमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामध्ये सहसचिव म्हणून काम करताना त्यांनी जवाहर रोजगार योजना यशस्वीपणे राबविली होती.

१९९२ मध्ये ते पुन्हा नागालँडमध्ये परतले. कृषी आयुक्त आणि राज्याचेमुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.नागालँडमध्ये असताना गोखले यांनी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केला होता. तेथील वनस्पतींची छायाचित्रे त्यांनी टिपली होती. या छायाचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकांमध्ये पुस्तकांचा जगभरामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केला जातो.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like