मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : मुंबई सह कोकणात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9 ते 12 जून या चार दिवसात अतिवृष्टीचा होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चार दिवसांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणार्‍या सर्व यंत्रणेनं, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेनं सज्ज आणि सतर्क राहून काम करावे तसंच परस्परांशी योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश दिलेत.

मुंबईत ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचतं अशा ठिकाणी 474 पंप बसवण्यात आल्याची माहिती मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. या पंपाद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल.अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून पाणी निचर्‍याचे काम करतील असेही ते म्हणाले. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याचं त्यांनी सांगितलं.

अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे छऊठऋ आणि डऊठऋच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणार्‍या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा बैठक घेतली होती.

 

You May Also Like