वरळीत लिफ्ट कोसळून चार ठार; सहा जण अडकले लिफ्टमध्ये

मुंबई।  मुंबईत वरळीमध्ये बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 

 

वरळीत अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्ली येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत संध्याकाळी लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण अद्याप लिफ्टमध्ये अडकून पडले आहेत. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले ३५ वर्षांचे लक्ष्मण मंडल केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. इतर चार गंभीर जखमींपैकी एकाचा केईएममध्ये आणि तिघांचा नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य करत आहे.

You May Also Like