पोलिस खात्यात नोकरीच्या आमीषाने फसवणूक

पावणे सहा लाखांचा गंडा
धुळे : पोलिस खात्यात नोकरीचे आमीष दाखवून शहरातील एकाची पावणे सहा लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी एकाविरुध्द शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
येथील चितोड रोड परीसरातील केबल ऑपरेटर सुरेश भुरा मासुळे (रा. शेलारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विनोद उर्फ बापू सरदार परदेशी (राजपुत) (रा. जांभळी, ता. चाळीसगाव) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. संशयित विनोद परदेशी याने सुरेश मासुळे यांच्या मुलांना पोलिस खात्यात नोकरी लावुन देतो, असे आमीष दाखविले, माझी मोठ्या साहेबांशी ओळख असल्याचे सांगुन विश्वास संपादन केला. नोकरीसाठी 5 लाख 68 हजार रुपयेेही घेतले. 22 जुलै 2020 ला सुरेश मासुळे यांच्या घरी व्यवहार झाला. पैसे घेऊनही नोकरी लावून दिली नाही आणि पैसेही परत केले नाहीत, त्यातून सुरेश मासुळे यांची फसवणुक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

You May Also Like

error: Content is protected !!