वाहनधारकांसाठी खुशखबर ! पेट्रोल प्रतिलीटर ५० रुपये दराने मिळण्याची शक्यता?

नवी दिल्ली : कच्च्या तेलावरून सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात ‘प्राईस वॉर’ सुरू आहे. या परिस्थितीत ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ म्हणतात त्याप्रमाणे भारताचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय आणि याचा सुखद परिणाम थेट तुमच्या खिशाला अनुभवायला मिळू शकतो. कारण, या कच्च्या तेलाच्या किंमतीच्या युद्धात पेट्रोल ५० रुपयांपर्यंत खाली घसरण्याची चिन्हं दिसत आहेत. सरकारचं इंपोर्ट बिल घटून पुढचा क्रुड बास्केटही सरकारला स्वस्त भावात उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

पेट्रोल, डिझेलसह अन्य पेट्रोलियम पदार्थांची आयात करणारा भारत हा चीननंतर सर्वात मोठा देश आहे. यामुळे भारताची परकीय गंगाजळी मोठ्या प्रमाणावर खर्च होते. या किंमत कपातीचा फायदा देशाच्या तिजोरीलाही होणार असून असे झाल्यास त्याचा थेट फायदा वाहन चालकांनाही मिळण्य़ाची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तबब्ल ३० टक्क्यांनी घसरल्या.

सौदी अरेबियाने आज कच्च्या तेलाच्या किंमती कपात केल्याने हे घडले आहे. सौदीने रशियाचा बदला घेतला आहे. सौदीने तेलाचे उत्पादन घटविण्याची विनंती रशियाला केली होती. मात्र, रशियाने काडीचाही भाव न दिल्याने सौदीने तेलाचे भावच कमी करून टाकले आहेत. या दोघांमधील शीतयुद्ध असेच काही काळ सुरू राहिले तर त्याचा थेट फायदा लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

दरम्यान भारताच्या क्रूड बास्केटची किंमत प्रति बॅरल ४७.९२ डॉलर आहे. म्हणजेच भारताला एका बॅरलसाठी ३५३०.०९ रुपये खर्च करावे लागतात. अशा स्थितीत जर ३० टकक्यांनी कपात झाली तर भारताचे जवळपास १००० रुपये वाचणार आहेत. म्हणजेच पुढील खरेदीवेळी बॅरल २४७० रुपयांना मिळणार आहे. सरकारने सर्वसामान्यांना लाभ द्यायचे ठरविल्यास पेट्रोल पुढील काही दिवसांत ५० रुपयांत मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.