एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल दोन खुनाच्या घटनेतील 5 महिन्यांपासून फरार

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल दोन खुनाच्या घटनेतील 5 महिन्यांपासून फरार असलेल्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील
रामेश्वर कॉलनीतील मेहरूण परिसरात राहणारा सुरेश बंजारा याला अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ६ फेब्रुवारी २०२१ रोजी संशयित आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत रा. मेहरूण आणि त्याचा भाऊ जितेंद्रसिंग शंतरसिंग राजपूत या दोघांनी सुरेश बंजारा याला मारहाण केली होती. हे भांडण सुरू असतांना आसाराम छोटीलाल पवार रा. मेहरूण भांडण सोडवित असतांना कल्लूसिंगने चाकूने वार करून खून केला होता. तर दुसऱ्या घटनेत ४ फेब्रुवारी २०१५ रोजी पत्नी अनिता राजपूत हिला मुलबाळ होत नाही म्हणून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. या दोन्ही घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत रा. मेहरूण हा फरार होता. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना संशयित आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत हा एमआयडीसी परिसरात आल्याची गोपनिय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, असीम तडवी, चेतन सोनवणे, सचिन पाटील यांनी संशयित आरोपीला एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे.

You May Also Like