मर्चंट नेव्हीतील युवकावर दोंडाईच्यात अंत्यसंस्कार

दोंडाईचा : अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्री वादळात मृत्यूमुखी पडलेले मर्चंट नेव्हीचे योगेश प्रकाश गोसावी दोंडाईचा येथील जवानावर शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या युवकाचे पापा-305 हे जहाज समुद्रात सापडले होते. यात 120 हुन अधिक व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

योगेश गोसावी हे फेब्रुवारी महिन्यात रवाना झाले होते. त्यांची तीन महिने ड्यूटी व तीन महिने सुटी असायची. त्यांचा मर्चंट नेव्हीतील जहाजवरचा चार वर्षांचा बाँड 15 मे रोजी पूर्ण झाला होता. जहाज मुंबई येथे पोहोचल्या नंतर ते घरी येणार होते. मात्र काळाने घात केला. आपले कर्तव्ये बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात दोंडाईचा येथील प्रकाश गिरीधर गोसावी कुरुकवाडेकर यांचे चिरंजीव योगेश प्रकाश गोसावी ( 34 वर्ष) यांचा समावेश होता. त्यांच्या मामाने ओळख पटवून शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन दोंडाईचा येथे आणला. त्यानंतर शनिवारी दोंडाईचा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

You May Also Like