गर्लफ्रेंडची आत्महत्या; काँग्रेस आमदाराच्या अडचणीत वाढ

भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी वनमंत्री काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्या गर्लफ्रेंडने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या अचडणीत वाढ झालीय. सिंगार यांची गर्लफ्रेंड सोनिया भारद्वाजने शाहपुरा येथे आत्महत्या केली. तिची सुसाईड नोटही मिळालीय. सोनिया आणि सिंघार लवकरच लग्न करणार होते, असंही तपासात समोर आलयं.

दरम्याण, घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये सोनिया यांनी काही संकेत दिले आहेत. मात्र कोणालाही थेट जबाबदार ठरवलेलं नाही. त्यामुळं पोलिस नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करताय. सिंघार यांच्या अनुपस्थितीत सोनियाने आत्महत्या केलीयं. त्यामुळं सोनियाच्या कुटुंबीयांच्या जबाबावर आता पुढील तपास अवलंबून असणार आहे. सोनियाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचा मुलगा आणि आई सोमवारी आले होते. आमदार सिंघारही याठिकाणी पोहोचले. त्यांनी सोनियाच्या आई आणि मुलाशीही चर्चा केली. त्यानंतर सोनिया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

You May Also Like