दिवाळीपर्वत सोने चांदी स्वस्तच

नाशिक । ऐन दिवाळीत नाशिकच्या सराफा बाजारामध्ये सोने-चांदीचे भाव स्वस्त असल्यामुळे सध्या अक्षरशः सुवर्ण पर्व सुरू आहे. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार रुपये नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली.
ऐन दिवाळीत नाशिकच्या सराफा बाजारपेठे मोठी उलाढाल सुरू आहे. धनत्रयोदशी दिवशी अंदाजे पन्नास कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत ही सर्वात चांगली उलाढाल झाल्याचे समजते. दरम्यान सोन्याचे भाव सध्याही स्वस्त आहेत. नाशिकमध्ये 1 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या नंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. सराफा बाजारात वसुबारसेच्या दिवशी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये नोंदवले, तर चांदीचे दर किलोमागे 65000 रुपये नोंदवले गेले. धनत्रयोदशीच्या दिवशी मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 900 रुपये आणि चांदीचे दर किलोमागे 65 हजार 500 रुपये नोंदवले गेले. बुधवारी सोन्याचे भाव जवळपास 700 रुपयांनी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 300 रुपये नोंदवले गेले. चांदीमध्ये जवळपास दोन हजारांनी घसरण झाली. किलोमागे चांदीचे दर 63 हजार 500 रुपये नोंदवले गेले. गुरुवारीही सोने-चांदी स्वस्त होते. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार रुपये नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली. शिवाय सायंकाळपर्यंत बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

You May Also Like