सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट

नवी दिल्ली : सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय बाजारांमध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये घट झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा 0.10% टक्क्यांनी घसरुन 48,627 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर, चांदी 0.21% टक्क्याच्या घसऱणीनंतर 70,663 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. या घसरणीनंतर दोन दिवसातच सोनं 1,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

मागील सत्रात भारतात सोन्याच्या दरात 2 टक्के म्हणजेच 950 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली होती. तर, चांदी 2.5 टक्क्यांनी म्हणजेच 1,800 रुपयांनी घटली आहे. जागतिक बाजारात अमेरिकी बॉन्डमध्ये आलेल्या घसरणीनंतर सोन्याचे दर दोन आठवड्याच्या निच्चांकावर गेले आहेत. मागील सत्रात झालेल्या दोन टक्के घसरणीनंतर सोन्याच्या हजर बाजारातील किमती 0.4 टक्क्यांनी घसरुन 1,862.68 डॉलरवर आल्या आहेत.

आज सोन्याच्या किमतीत 0.10 टक्क्यांची घसरण आली. यानंतर दहा ग्रॅम सोन्याचे भाव 48,627 रुपयांवऱ आले आहेत. तर, चांदीच्या किमतीत 0.21टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यानंतर MCX वर चांदीच्या किमती 70,663 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करत आहेत.

You May Also Like