सोन्याच्या किंमतीमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याचे आणि चांदीचे दर उतरले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी कमी होत 47,776 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी कमी होऊन 69, 008 प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोन्याचे दर स्थिर आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन सोन्याची वायदे किंमत 0.1% ने वाढून 1,804.30 डॉलर प्रति औंस झाली आहे.

रेकॉर्ड लेव्हलवरून 8750 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

2020 साली सोन्याचे दर या कालावधीदरम्यान सर्वोच्च स्तरावर होते. त्यावेळी सोन्याचे दर 56191 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आज ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 47700 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. अर्थात सोन्याचे दर 8750 रुपये प्रति तोळाने स्वस्त मिळत आहेत.

You May Also Like