‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राच्या तब्येतीत बिघाड; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली ।  ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भालाफेक खेळाडू नीरज चोप्राची प्रकृती तीन दिवसांपासून अस्वस्थ होती. नीरजला ताप आणि घसा खवखवण्याचा त्रास जाणवत होता. आता त्याची प्रकृती पुन्हा खालावली असून त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.

 

 

ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज 10 दिवसांनी मंगळवारी पानीपत येथे पोहोचला. समालखा येथील हल्दाना सीमेवर खंडरा येथे नीरजच्या गाड्यांचा ताफा थांबला होता. यावेळी त्याचा सत्कार करण्यात येणार होता. मात्र त्याला स्वागत समारंभाच्या मध्यातच व्यासपीठाच्या मागच्या बाजूने बाहेर नेण्यात आलं. प्रकृती अस्वस्थामुळे कुटुंबीयांनी नीरजला रुग्णालयात दाखल केल्याचं समजतं. त्याला कोणत्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं हे अद्याप कळू शकलेलं नाही.

 

You May Also Like