करोनातही बांगलादेशला आले ’अच्छे दिन’! उत्पन्नात वाढ; भारताला पिछाडीवर

ढाका : संपूर्ण जग दोन दीड वर्षांपासून करोना संकटाचा सामना करत आहे. लाखो लोकांच्या नोकर्‍यांवर गंडांतर आलयं. कोट्यवधी लोकांना पगार कपात सहन करावी लागतेय. व्यवसायिकांच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाली. यातच करोनातही बांग्लादेशला अच्छे दिन आले आहे. प्रती माणशी उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशनं भारताला मागे टाकलं आहे. बांगलादेशी आणि भारतीय व्यक्तीच्या वार्षिक सरासरी उत्पन्नाची तुलना केल्यास आता भारत मागे पडला आहे.

प्रती माणसी उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशनं भारताला मागे टाकलंय. भारतीय नागरिकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न 1947 डॉलर म्हणजेच 1.41 लाख रुपये आहे. भारत सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार, करोना विषाणूमुळे फैलावलेल्या महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आला. त्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. त्यामुळे प्रती माणशी उत्पन्नात घट झाली. तर याच कालावधीत बांगलादेशमधील नागरिकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न 2227 डॉलरवर गेलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 9 टक्के आहे.

सरासरी वार्षिक उत्पन्नाचा आकडा लक्षात घेतल्यास बांगलादेशी नागरिकांचं उत्पन्न भारतीयांपेक्षा अधिक असल्याचे दिसुन येतयं. गेल्या काही वर्षांत बांगलादेशनं उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष दिलं. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बांगलादेशी नागरिकाचं सरासरी वार्षिक उत्पन्न 2227 डॉलर म्हणजेच 1.62 लाख रुपयांवर पोहोचलं. गेल्या वर्षी बांगलादेशी नागरिकाचं वार्षिक उत्पन्न 2064 डॉलर म्हणजेच 1.46 लाख रुपये होतं.

You May Also Like

error: Content is protected !!