खुशखबर! या वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिनच्या चाचणीला होणार सुरूवात; केंद्र सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : करोनाच्या दुसर्‍या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून, तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल अशी भीती व्यक्त केली जातेयं. लहान मुलांसाठी करोना विरोधातील लसीकरण कधी सुरू होणार? तसेच या लसीकरणासाठीच्या चाचण्या कधी सुरू होणार? अशी विचारणा केली जात आहे. याबाबत मोठी घोषणा केंद्र सरकारच्यावतीने नीती आयोगाचे सदस्य असलेल्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी केलीयं.

नीती आयोगाचे सदस्य (वैद्यकीय) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने कोव्हॅक्सिन या लसीची 2 ते 18 वयोगटामधील लहान मुलांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. आता या वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिनची चाचणी ही येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये सुरू होणार आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांमध्ये कोरोनाची विचित्र लक्षणे दिसून येत आहेत. यामध्ये सुमारे 10 वर्षांच्या वयोगटातील मुलांमध्ये गॅस्ट्रोएंटेरायटीसचाही समावेश आहे. काही मुलांमध्ये त्वचेवर व्रण आणि अन्य त्वचारोग दिसून येत आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पालकांपासून ते सरकारपर्यंत सर्वांचीच चिंता वाढलेली आहे. त्यातच तिसर्‍या लाटेपूर्वीच दुसर्‍या लाटेमधून समोर आलेली लहान मुलांमधील संसर्गाची आकडेवारी चिंतेत टाकणारी आहे.

You May Also Like

error: Content is protected !!