महाराष्ट्रासाठी Good News! ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमहून रवाना

विशाखापट्टणम :  महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवेंचा तुटवडा निर्माण झालाय. मुख्यता राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे.

दरम्यान, ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी विशाखापट्टणम येथील स्टील प्रकल्पातून रेल्वेद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणममधून निघाली आहे.

मुंबईतील कळबोळी येथून विशाखापट्टणम येथे ७ ऑक्सिजन टँकर घेऊन एक्सप्रेस काल पोहचली होती. तिला तेथे पोहचायला ५२ तास लागले. तेथे ऑक्सिजन भरल्यानंतर मध्यरात्री ही एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. ही एक्सप्रेस उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत नागपूरला दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ती शनिवारी मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतरच महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

 

You May Also Like