मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी

नवी दिल्ली : दिल्लीत जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांचे कोचिंग क्लास पुन्हा ऑनलाइन किंवा ऑनलाइन सुरू होणार आहे. दिल्ली सरकारच्या एससी-एसटी ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘जयभीम मुख्यमंत्री’ क्लासेससाठी विशेष बैठक

शुक्रवारी दिल्ली सचिवालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मंत्री राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, जेव्हा दुसऱ्या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास सुरु आहेत तेव्हा या योजनेअंतर्गत शिकणारे विद्यार्थ्यी मागे राहू नये. या बैठकीत एससी-एसटी ओबीसी कल्याण विभागाचे सचिव आणि अधिकारीही उपस्थित होते.

मंत्रीमहोदयांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोव्हिड संदर्भातील गाईडलाईन्स लक्षात घेता ऑफलाइन वर्ग घेता येतात का, हे पाहणं. तशी चाचपणी करावी. जर ऑफलाइन शारीरिक वर्ग आयोजित करणे शक्य नसेल तर ऑनलाईन वर्गातून मुलांचे प्रशिक्षण सुरू केले पाहिजे, अशा सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना केल्या.

विशेष देखरेख समिती काम करणार

ऑनलाइन क्लासेसमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी देखरेख समितीमार्फत काम केले जाईल. मंत्री राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, ऑनलाइन कोचिंग वर्ग सुरू केले तर शिक्षणाचा दर्जा कायम ठेवला पाहिजे आणि मुलं खरोखरच ऑनलाइन वर्गात सहभागी होत आहेत याची खात्री करुन घ्यावी. या योजनेंतर्गत अशीही तरतूद आहे उमेदवार मोठ्या कोचिंग संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

You May Also Like