पवारांच्या टीकेनंतर राज्यपाल कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया

पिंपरी ।   राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या  मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी  राज्यपालांवर निशाणा साधला होता. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि राज्यसरकार यांच्यात कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरुन वाद रंगत असल्याचं पहायला मिळत आहे. आता शरद पवारांनी केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं, शरद पवार देशातील सन्मानीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असं नाही.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी म्हटलं, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. आता यापुढे 12 आमदारांबाबत आग्रही नाही असं राज्यपाल बोलले होते पण आता शहाण्यांना शब्दाचा मार.. फक्त शहाण्यांना, या पुढे 12 आमदारांच्या प्रश्नाबाबत शब्द खर्ची घालणार नाही असे सांगितले.

You May Also Like