‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ प्रकरणी महेश मांजरेकर यांना मोठा दिलासा

मुंबई । अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा प्रदर्शनाआधीच वादाच सापडला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. पण मुंबई उच्च न्यायालयाकडून महेश मांजरेकर यांना दिलासा मिळाला आहे. “पुढची सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका”, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. या चित्रपटातील काही सीनवर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटतील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याची मागणी केली जातेय. तर काहींनी “हा चित्रपट प्रदर्शितच केला जाऊ नये”, अशी भूमिका घेतली आहे. अश्यातच मुंबई उच्च न्यायालयाने महेश मांजरेकरांना दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने या सिनेमाविरोधात तक्रार करण्यात आली होती.
—–न्यायालयाने काय म्हटलं?
अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ प्रदर्शनाआधीच वादाच सापडला. पण या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मांजरेकरांना दिलासा दिला आहे. “पुढची सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका”, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय.
—–महेश मांजरेकारांचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात!
महेश मांजरेकरांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील काही सीनवरुन हा वाद सुरु झाला. हेच आक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महिला आयोगाने थेट पत्र लिहून केली होती. तसंच हा ट्रेलरही युट्यूबवरुन काढून टाकावा, अशी मागणीही महिला आयोगाने केली. त्यानंतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चित्रपटाचा ट्रेलर हटवण्यात आला.
—–चित्रपटात नेमकं काय?
ज्येष्ठ नाटककार, ज्यांचं नुकतंच निधन झालंय, त्या जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर असल्याची माहिती आहे.

You May Also Like