कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पालकत्व स्वीकारण्याची घोषणा

जळगाव : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली आहे. या बालकांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभासह ना. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. तर जनतेचे प्रेम व आशीर्वाद हीच आपली ताकद असली तरी यंदा फक्त मोबाईल क्रमांकावरूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, कोविडच्या आपत्तीमुळे ना. गुलाबराव पाटील यांनी ५ जून रोजी येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे घोषीत केले असून या दिवसाला जिल्हाभर फक्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर कार्यकर्त्यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या चाहत्यांनी भर दिला आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा ५ जून रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त दरवर्षी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. वाढदिवसाला पाळधी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या मैदानावर सायंकाळी जंगी सभा देखील होत असते. गेल्या वर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे ना. पाटील यांनी वाढदिवस साजरा केला नव्हता. तर यंदा देखील वाढदिवस साजरा करण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आजवर चाहते मोठ्या उत्साहात व चैतन्यदायी वातावरणात वाढदिवस साजरा करत असतात. यानिमित्त होणार्‍या सभेतून लोकांशी संवाद देखील साधता येतो. मात्र कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यात आले असून याचे पालन करत गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील आपण वाढदिवस साजरा करणार नाही. वाढदिवस पुढे देखील साजरे करता येतील. मात्र आजची प्राथमिकता ही कोरोनाग्रस्तांची सेवा आणि शासकीय नियमांचे पालन ही आहे. यामुळे आपल्या वाढदिवसाला कोणत्याही अभिष्टचिंतनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नाही. पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आपण फक्त फोनसह सोशल मीडियातूनच शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फक्त कोरोनाच्या आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाभर आवश्यक त्या कार्यक्रमांना कार्यकर्त्यांनी व त्यांच्या प्रेमींनी भर दिला आहे.

दरम्यान, जनतेचे प्रेम व आशीर्वाद हीच आपली ताकद असली तरी यंदा फक्त मोबाईल क्रमांकावरूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे आवाहनदेखील पालकमंत्र्यांनी केले आहे. यासाठी चाहत्यांनी ९३२५८७३३९९; ९७६४०३३६०१; ९९२३३५८८१४ आणि ९१५८०३३३२१ या क्रमांकांवर कॉल, व्हाटसअ‍ॅप मॅसेज अथवा एसएमएस करून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन देखील भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशन च्यावतीने करण्यात आले आहे.

You May Also Like