गुलशन कुमार हे संगीत विश्वातील एक मोठं नाव होतं

मुंबई : गुलशन कुमार हे संगीत विश्वातील एक मोठं नाव होतं. त्यांनी सुरु केलेली टी सीरिज आज भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. अंडरवर्ल्डला खंडणी न दिल्यामुळं 1997 साली मंदिराबाहेर तब्बल 16 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची हत्या होणार असल्याची टीप पोलिसांना आधीच मिळाली होती. गुलशन कुमार की विकेट गिरने वाली है असा एक फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी तत्काळ हालचाली केल्या गेल्या परंतु त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आली.

मुंबईचे माजी पोलीस कमिश्मर राकेश मारिया यांनी IANS ला दिलेल्या मुलाखतीत गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी या फोनचा प्रसंग सांगितला.
गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी हायकोर्टाचा निर्णय, आरोपीची याचिका फेटाळली
काय म्हणाले राकेश मारिया ?
“सर, गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है अशी माहिती मला माझ्या संपर्कात असलेल्या एका खबऱ्याने दिली होती. मी त्याला विचारलं ‘कौन गिरानेवाला है विकेट?’ तर त्याने उत्तर दिलं “अबू सालेम, उसने अपने शूटर्स के साथ सब प्लान नक्की किया है गुलशन कुमार साहाब रोज घरसे निकलके पहले एक शिव मंदिर जाता है. वहींपे काम खतम करने वाले है..” अशी माहिती मला खबऱ्याने दिली. ज्यानंतर मी त्याला विचारलं की ‘खबर पक्की है क्या?’ तर तो म्हणाला “साहब एकदम पक्की खबर है, नहीं तो आपको कैसे बताता?” मी त्याला म्हटलं की ‘और कुछ खबर मिले तो बताना’ असं म्हणून मी त्याचा फोन ठेवला आणि विचारात पडलो की आता काय करावं?”

You May Also Like