धुळ्यात गावठी कट्टा बाळगणार्‍याला अटक

धुळे । गावठी कट्टा (पिस्तुल) हातात घेऊन छायाचित्र काढणार्‍या तरुणाला चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली, त्याच्याकडून कट्टाही जप्त केला असून अधिक माहिती पोलिस घेत आहेत.

चाळीसगांव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी कबीरगंज परीसरात तपास केला, पोलीस पथकाने सत्तार वाडा, रहेमत मस्जीद जवळ, कबीरगंज येथे आले व त्याठिकाणी राहत असलेल्या इसमाच्या घरी जावुन शोध घेतला. तेथील संशयित मोबीन शेख गुलाम गौस (वय 21. रा. रहमत मशीदजवळ) याच्या हातात गावठी बनावटीचा कट्टा असलेले छायाचित्रे मोबाईलमध्ये आढळले. त्याच्याकडे गावठी कट्ट्या विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने घरामधील लोखंडी पेटीत ठेवलेली गावठी बनावटीची पिस्तुल काढुन दिली. पिस्तुल ताब्यात घेण्यात आली. हवालदार स्वप्नील सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

पो.अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्यामार्गदर्शनाखाली चाळीसगांव रोड पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक योगेश ढिकले, विजय चौरे, हवालदार अजीज शेख, भुरा पाटील, मुक्तार शाह, हेमंत पवार, संदिप वाघ, स्वप्निल सोनवणे, सोमनाथ चौरे यांनी कारवाई केली.

You May Also Like