कासारे येथे सव्वा लाखांचा गुटखा जप्त

साक्री : तालुक्यातील कासारे येथील सागर बागुल याच्या घरात पानमसाला व सुगंधी तंबाखू यांचा सुमारे 1 लाख 23 हजार रुपयांचा साठा आढळून आला. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली असून हा साठा घरात आढळून आला. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात सागर बागुल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सूत्रांकडून माहिती मिळाली की, कासारे गावात सागर सुरेश बागुल (वय 25) याने त्याच्या घरात पानमसाला व सुगंधित तंबाखू याचा विक्रीसाठी साठा केला आहे. याविषयीची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोहेकॉ शिरसाट, होकॉ पाटील, अहिरे, पाटील, वाघ आदींच्या पथकाने बुधवारी दि 23 रोजी सायंकाळी 7:30 वाजता कासारे गावात जाऊन सागर बागुल याच्या घरात जावून छापा टाकला. यावेळी 1 लाख 23 हजार 350 रुपये किमतीचे पानमसाला व सुगंधित तंबाखू आदी विक्रीच्या उद्देशाने साठवणूक केल्याचे आढळून आले. घटनास्थळी पोलिस प्रशासनाच्या वतीने अन्न औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी आढळून आलेल्या साठ्याची पाहणी केली. तसेच सागर बागुल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील तपास पोहेकॉ के आर पाटील करीत आहेत.

You May Also Like