“करोनाविरुद्धच्या लढ्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा” भाजप नेत्याचा घरचा आहेर

नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णांच्या संख्येने २ कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यातच आता भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही करोनावरून केंद्राला घरचा आहेर दिला आहे.

त्यांनी म्हंटले आहे की, पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या करोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची करोनाची परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

“ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना महामारीचा सामना करुन नक्कीच टिकू. आता आपण योग्य काळजी घेतली नाही, तर मुलांवर परिणाम करणारी आणखी एक लाट आपल्याकडे येईल. त्यामुळे मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे उपयोगाचे ठरणार नाही,” असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

याचबरोबर, सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याबद्दलही भाष्य केले आहे.

“नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिले जात नाही. परंतू अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी ट्विटद्वारे केली आहे. दरम्यान, नितीन गडकरीच का? असा प्रश्न एकाने विचारला असता सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “करोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे”.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like