पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हर हर महादेवचा जयघोष

नवी दिली : करोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी वाराणसी येथील आरोग्य कर्मचारी आणि अधिकार्‍यांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलता बोलता अश्रू अनावर झाले. करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना पंतप्रधानांना बोलता येत नव्हते. बैठक सुरू होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर हर महादेव’ चा जयघोष केला. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे उपस्थित असलेल्या कर्मचारी अधिकार्‍यांनीही ‘हर हर महादेव’ असे म्हणत प्रतिसाद दिला.

करोनाच्या दुसर्‍या लाटेचा भारताला मोठा फटका बसला रुग्णसंख्येसोबतच बळींच्या संख्येनेही उच्चांक गाठले आहेत. देशात रुग्णसंख्या कमी होत असताना रोज चार हजारांहून अधिक मृत्यूंची संख्या वेगाने वाढत आहे. पंतप्रधान या परिस्थितीची माहिती देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा करत आहेत. शुक्रवारी वाराणसी येथील अधिकारी कर्मचार्‍यांशी बोलताना करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना भावूक झाले.

पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला. ‘या व्हायरने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतलं आहे. मी त्यांच्याबद्दल नम्र आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो,’ असे बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.

You May Also Like