एचडीएफसी बँकेला आरबीआयकडुन 10 कोटींचा दंड?

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी खासगी बँक म्हणून ओळख असलेल्या एचडीएफसी बँकेला आरबीआयकडुन 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. नियामक टप्प्यातील कमतरता आणि बँकेने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता यावर स्थिती स्पष्ट न केल्याने आरबीआयने कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.

एचडीएफसीच्या वाहन कर्ज पोर्टफोलिओमध्ये काहीतरी गडबड झाल्याबद्दल एका व्हिसलब्लोअरने आरबीआयकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर आरबीआयकडुन थर्ड पार्टी नॉन फाइनेंशियल प्रोडक्ट्स-आर्थिक उत्पादनांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासात काही त्रुटी आढळल्याने या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागितले.

या दरम्याण, रिझर्व्ह बँकेने बजावलेल्या नोटिसीला एचडीएफसी बँकेकडून उत्तर देण्यात आले. मात्र, या उत्तरावर रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले नाही. यामुळे शेवटी तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्याने कऊऋउ बँकेला 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एका अहवालानुसार, बँक ग्राहकांना वाहन कर्ज मंजूर करताना पारदर्शक व्यवहार करत नव्हती. देशातील सर्वात मोठी खासगी बँक वाहन कर्जाशी संबंधित नियमांचे पालन करीत नाही, असे दिसून आल्याचे सांगितले जात आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 6(2) आणि कलम 8 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे कऊऋउ बँकेला हा दंड ठोठावल्याचे सांगितले जात आहे.

You May Also Like