राज्यातील विविध भागात मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी लावली

बुलडाणा : काल राज्यातील विविध भागात मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि चिखली तालुक्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक छोट्या-मोठ्या नदी -नाल्यांना पूर आला आहे. खामगाव तालुक्यातील अशाच एका नाल्याला आलेल्या पुरातून रस्ता ओलांडणं एका महिलेच्या चांगलंच अंगलट आलं होतं. पण दैव बलवत्तर म्हणून ही महिला पुराच्या पाण्यात वाहून जाताना थोडक्यात बचावली आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला आहे. येथील एका तरुणानं प्रसंगावधान दाखवत हातातील छत्री दुसऱ्याकडे सोपवत धावत जाऊन महिलेचा जीव वाचवला आहे. खरंतर खामगाव तालुक्यातील चिंचपूर गावात काल जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे गावातील नाले तुडुंब भरले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या नाल्याच्या दोन्ही बाजूला अनेक नागरिक अडकून पडले होते.

You May Also Like