धुळ्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

धुळे : शहरासह जिल्ह्यातील काही भागाला तौते वादळाचा फटका बसला. रविवारी ४.३७ वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे पिंकाचे मोठे नूकसान झाले आहे. सध्या अरबी समुद्रात तौते चक्रीवादाळाचं संकट घोंघावत आहे. हे चक्रीवादळ आता हळूहळू उग्र रुप धारण करत त्यानं आपली दिशा बदलली आहे. आता हे वादळ मुंबईला भेदून गुजरातच्या दिशेनं आगेकूच करणार आहे. सध्या हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकलं असून मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उर्वरित कोकणातील नागरिकांसाठी धोका वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर मुंबईतही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

सायंकाळी 4 वाजेपासूनच वातावरण अधिकच गडद झाले होते. अचानक वादळीवारा सूरू झाला व पावसाला सुरूवात झाली. वीस मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विज पूरवठा खंडित झाला होता. शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यातही काही ठिकाणी पावसाने काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा संकटाचे सावट उभे ठाकले असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

You May Also Like