जळगावातील चोपड्याजवळ हेलिकॉप्टर कोसळले

एकाचा मृत्यू तर महिला वैमानिक गंभीर जखमी

जळगाव । चोपडा तालुक्यातील वर्डी गावानजीक हॅलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक प्रवासी ठार झाला आहे. तर एक महिला वैमानिक गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली.

शिरपूर येथील हवाई प्रशिक्षण केंद्राचे हेलिकॉप्टर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्डी गावापासून उत्तरेच्या दिशेला 7 कि.मी. अंतरावर जंगलात दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास आकाशात घिरट्या घालत होते. ते राम टेकडी परिसरात अचानक कोसळले. प्रचंड आवाज झाल्याने या परिसरातील आदिवसी बांधव व वर्डी गावातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टरमध्ये दोन जण होते. दोन्ही प्रशिक्षणार्थी पायलट होते. ते मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती मिळाल आहे.

 

यामध्ये एक जण ठार तर महिला पायलट गंभीर जखमी झाली होती. हेलिकॉप्टरमध्ये ती अडकली होती. ग्रामस्थांनी तिला बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून तिला चोपड्याला उपचारासाठी हलवले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण दोनच जण होते. सरावा दरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती मिळत आहे.

You May Also Like

error: Content is protected !!