केंद्राकडून मदत! पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 700 कोटी मंजूर

मुंबई । काही दिवसांपासून अतिवृष्टी  झाल्यामुळे शेतकऱ्यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 700 कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.

 

 

राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून 700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती दिली आहे.

 

 

 

पूरग्रस्तांसाठी उद्या विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता

आज  बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. पूरग्रस्तांच्या प्रश्नामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत विशेष पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही बैठक प्रदीर्घ असणार आहे. दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीत नुकसानीच सादरीकरण होणार आहे. प्रत्येक विभागाकडून नुकसानीची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर आपत्तीग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.

You May Also Like