CoronaVirus : आदिम अनुसूचित ठाकूर जमात मंडळाची मुख्यमंत्री सहायत्ता निधीस मदत

  • मुख्यमंत्री सहायत्ता निधीस १ लाख १ हजार १११ रूपयांचा डीडी सुपूर्द

धुळे : संपुर्ण विश्वातील तसेच भारतात करोना विषाणु व्हायरस सारखा आजारामुळे देशातील सर्व राज्य संकटात सापडली आहेत. अशाच संकटात आपले महाराष्ट्र राज्य सदर करोना विषाणु व्हायरसच्या विळख्यात अडकले आहे अशा उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आदिम अनुसूचित ठाकूर जमात मंडळाने मुख्यमंत्री सहायत्ता निधीस १ लाख १ हजार १११ रूपयांचा डीडी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुपुर्द केला.

अशा या उद्भवलेल्या कठीण संकटात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तसेच माणुसकीची व सामाजिक बांधीलकी तसेच जबाबदारी स्विकारुन महाराष्ट्रातील अल्प गरीब परिस्थितीतील श्रमिकवकष्टकरी अनुसूचित जमात बांधवांना आमच्या अनुसूचित ठाकूर जमातीच्या खालील पदाधिकारी व समाजसेवक यशवंत बागुल, संजय साळके, दरवारसिंगझुलालसिंग ठाकूर, किशोर महाले सर्व धुळे, बंड संपत पवार, कैलास देवरे, गोरव चव्हाण, महेंद्र भामरे, विजय निकम सर्व नाशिक, सुभाष ठाकूर, प्रल्हाद शिंदे, तुकाराम पवार, जनादन ठाकूर, चंद्रकांत सोनवणे, भगवान ठाकूर, मदन कदम, रामदास जगताप, शिवानी पवार, सतिश शिंदे सर्व मराठवाडा, गोपाल किसन ठाकूर, वासुदेव ठाकूर, एस.पी.टाकूर, शैलेंद्र ठाकूर, सुदाम टाकुर सर्व जळगांव, भुसावळ, लिलाधर ठाकुर, नथ्यू वानखेडे, शांताराम ठाकूर, अमळनेर, राजेंद्र भामरे, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र पवार सर्व ठाणे, हेमंत चंदन ठाकूर (वाघ) खोपोली, हरमेश टाकूर, विवेक ठाकूर नंदुरबार. प्रकाश चव्हाण, विश्वास चव्हाण, भाऊसाहेब सुर्यवंशी, दिनेश अहिरे, बापू वाघ, सर्व मालेगांव पी.एस.अहिरे, दिलीपराव देवरे, गोविंदराव पवार सर्व पुणे व विनोदराय शिंदे, अकोलाअशा अनेक आमच्या अनुसूचित ठाकूर जमातीतील पदाधिकारी व मान्यवरांनी वरील विषयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करावयाच्या मदतीच्या आवाहनास प्रतिसाद दिला.

अशा या अती कठीण संकटाप्रसंगी आपण जे धिरोदात्तपणे निर्णय घेवून या संकटास सामोरे जात आहात याचा महाराष्ट्रातील तमाम जनतेला व आमच्या महाराष्ट्रातील अनुसूचित ठाकुर जमातीस सार्थ अभिमान आहे.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.